

NASA satellite images of India pollution
esakal
NASA satellite images India pollution: उत्तर भारत आणि पाकिस्तानच्या मोठ्या भूभागावर पसरलेल्या वायुप्रदूषणाचे भीषण चित्र नासाच्या उपग्रहाने टिपले आहे. हिवाळ्याची सुरुवात होताच या भागातील हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे या छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे. संपूर्ण इंडो-गंगेच्या मैदानावर राखाडी रंगाचा धुरक्याचा दाट थर पसरल्याचे दिसत आहे.