नासाच्या सौर विजयाला तांत्रिक बिघाडाचे ग्रहण

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या नासाच्या "पार्कर सोलर प्रोब' या पहिल्या मानवविरहित यानाच्या प्रक्षेपणास आज तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले, "नासा'चे हे यान अवकाशात झेपावण्यासाठी अवघे 55 सेकंद शिल्लक राहिले असताना प्रक्षेपण नियंत्रकाच्या कक्षातून "होल्ड, होल्ड, होल्ड' असा आवाज आला आणि शास्त्रज्ञांच्या काळजाचा ठोका चुकला. याला कारणीभूत ठरला "हेलियम सिस्टीम'मधील बिघाड. यामुळे "नासा'ला पार्कर सोलर प्रोबचे प्रक्षेपण उद्यावर (ता.12) ढकलावे लागले. रविवारी सकाळी पुन्हा आम्ही प्रक्षेपणाचा प्रयत्न करणार आहोत, असे "नासा'कडून जाहीर करण्यात आले. 

टाम्पा (फ्लोरिडा) : सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या नासाच्या "पार्कर सोलर प्रोब' या पहिल्या मानवविरहित यानाच्या प्रक्षेपणास आज तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले, "नासा'चे हे यान अवकाशात झेपावण्यासाठी अवघे 55 सेकंद शिल्लक राहिले असताना प्रक्षेपण नियंत्रकाच्या कक्षातून "होल्ड, होल्ड, होल्ड' असा आवाज आला आणि शास्त्रज्ञांच्या काळजाचा ठोका चुकला. याला कारणीभूत ठरला "हेलियम सिस्टीम'मधील बिघाड. यामुळे "नासा'ला पार्कर सोलर प्रोबचे प्रक्षेपण उद्यावर (ता.12) ढकलावे लागले. रविवारी सकाळी पुन्हा आम्ही प्रक्षेपणाचा प्रयत्न करणार आहोत, असे "नासा'कडून जाहीर करण्यात आले. 

विशेष म्हणजे आज सूर्यग्रहणाच्या दिवशीच नासाने "पार्कर सोलर प्रोब' ला सूर्याच्या दिशेने सोडण्याचे नियोजन आखले होते; पण तांत्रिक बिघाडामुळे त्यात व्यत्यय आल्याने अनेकांनी याचा संबंध ज्योतिषशास्त्राशीही जोडला आहे. हेलियमच्या दबावामुळे हा तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता; पण रविवारी पुन्हा आम्ही प्रयत्न करू, असे "युनायटेड लॉंच अलायन्स'ने म्हटले आहे. 

संशोधकांचा हिरमोड 
सूर्यावरील मानवाची ही पहिलीच मोहीम असून, संशोधक आणि अभ्यासकांमध्ये तिच्याबाबत मोठे कुतूहल होते; पण तांत्रिक बिघाडामुळे या मोहिमेला स्थगिती देण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तब्बल साठ वर्षांपूर्वी सौर वादळाच्या अस्तित्त्वाची संकल्पना मांडणारे शिकागो विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ यूजीन पार्कर यांचे नाव या अंतराळ यानाला देण्यात आले आहे. नव्वदी ओलांडलेल्या पार्कर यांनाही नासाचा हा सौर विजय पाहण्याची मोठी उत्सुकता होती; पण अखेरच्या क्षणी त्यांचाही हिरमोड झाला. 

मोहिमेचे अंतरंग 
प्रथमच सूर्याच्या वातावरणात प्रवेश 
सौर संरचना आणि वादळांचा अभ्यास 
"कोरोना'च्या उष्णतेचे रहस्य उलगडणार 
मोहिमेवर नासाचा 1.5 अब्ज डॉलरचा खर्च 
सूर्याच्या जवळ पोचताच यानाचा वेग वाढणार 

Web Title: NASAs Solar Vulnerability to Technical Vulnerabilities