कैलास मान यात्रेसाठी नथुला खिंड खुली 

पीटीआय
बुधवार, 9 मे 2018

कैलास मानसरोवर यात्रेसाठी नथुला खिंड पुन्हा खुली करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी दिली. 
 

नवी दिल्ली - कैलास मानसरोवर यात्रेसाठी नथुला खिंड पुन्हा खुली करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी दिली. 

संरक्षणाच्या कारणावरून गेल्या वर्षी भारत व चीनमध्ये डोकलामवरून वाद निर्माण झाल्याने चीनने मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी नथुला खिंड बंद केली होती. यामुळे यात्रेकरूंमध्ये नाराजी होती. ""जोपर्यंत नागरिकांमधील संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत दोन्ही देशांमधील सरकारमधील संबंध सुरळित होणार नाहीत, असे मी चिनी परराष्ट्र खात्याला सांगितले होते.

आता यात्रेसाठी नथुला खिंड खुली केल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे,'' असे सुषमा स्वराज म्हणाल्या. या यात्रेसाठी भाविकांची गटवार निवड आज संगणकाच्या मदतीने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी स्वराज उपस्थित होत्या.  

Web Title: Nathula Ridge Open for Kailas Man Yatra