देश विरोधकांना प्रत्युत्तर देत आहे: प्रसाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या व्यवहाराची माहिती मागितल्याच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांनी प्रश्‍न उपस्थित केले असून याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी गरीबांसाठी असलेल्या सरकारबद्दल संशय व्यक्त करणाऱ्यांना जनता चोख (निवडणुकीतून) प्रत्युत्तर देत असल्याचे म्हटले आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सादर करावी, अशी सूचना आज (मंगळवार) पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. या सूचनेवर विरोधकांनी प्रश्‍न उपस्थित करत लोकसभेत आलेला प्राप्तीकर कायद्यातील सुधारणांचा प्रस्ताव हा काळा पैसा पांढऱ्या करण्यासाठीच आणण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी आज संसदीय समितीच्या बैठकीत हा आरोप फेटाळून लावला आहे.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना प्रसाद म्हणाले, "विरोधकांनी सभागृहात जे विधान केले आहे त्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. त्यांच्या (विरोधकांच्या) टीकेबद्दल बोलायचे झाले तर या देशातील जनतेने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही मध्यप्रदेश आणि आसाममधील निवडणुकीत जिंकलो आहोत. त्रिपुरामध्ये आम्हाला मताधिक्‍य वाढले आहे. तर महाराष्ट्रामध्येही पक्षाला यश मिळाले आहे. त्यामुळे आम्ही देशासाठी काम करत आहोत आणि आम्ही देशासाठी काम करणे सुरूच ठेवणार आहोत. आमचे सरकार हे गरीबांसाठी समर्पित आहे.' तसेच "भारतीय राज्यघटनेमध्ये "अर्थ विधेयक' म्हणजे काय हे आणि नाही हे लिहिलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्राप्तीकरामध्ये केलेला कोणताही बदल अध्यक्ष प्रमाणित करतात त्यावेळीच ते अर्थ विधेयक ठरते', असेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Nation giving appropriate reply to opposition criticism, says Prasad