सर्व चित्रपटगृहांत राष्ट्रगीताची सक्ती

पीटीआय
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली  - देशभरातील चित्रपटगृहांनी चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावलेच पाहिजे आणि लोकांनीही आदर म्हणून उभे राहिलेच पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. 

राष्ट्रगीत वाजवले जात असताना पडद्यावर राष्ट्रध्वज दाखविला पाहिजे, अशीही सूचना न्यायाधीश दीपक मिश्रा आणि अमित्वा रॉय यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. या आदेशाची आठवडाभरात अंमलबजावणी करावी आणि याविषयी मुख्य सचिवांच्या मार्फत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती द्यावी, असे निर्देशही खंडपीठाने केंद्र सरकारला दिले. 

राष्ट्रगीतासाठी जे नियम आहेत, त्याच्या मुळात राष्ट्रीय ओळख, अखंडत्व आणि घटनात्मक राष्ट्रभक्‍ती आहे. व्यावसायिक कारणासाठी राष्ट्रगीतात कोणतेही फेरफार किंवा ते संक्षिप्त केले जाऊ नये, असेही या वेळी न्यायालयाने सांगितले. विशेषत: जाहिरातींमध्ये राष्ट्रगीताच्या अन्य स्वरूपाचा वापर करू नये, असे न्यायालयाने म्हटले. याशिवाय, आक्षेपार्ह वस्तूंवर राष्ट्रगीत छापले किंवा दाखवले जाऊ नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. श्‍याम नारायण चौकसे यांनी न्यायालयात याविषयी जनहित याचिका दाखल केली होती.

Web Title: national-anthem forced all theatre