Muslim Reservation : कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण!

श्रेणी II ब अंतर्गत कर्नाटक राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसी ठरवण्यात आलेलं आहे. आयोगाने म्हटलं की, श्रेणी - १ मध्ये १७ मुस्लिम समुदायांना ओबीसी ठरवण्यात आलेलं आहे. तर श्रेणी २ ए मध्ये १९ मुस्लिम समुदायांना ओबीसी ठरवण्यात आलेलं आहे.
Muslim Reservation
Muslim Reservation esakal
Updated on: 

Loksabha election 2024 : मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुस्लिमांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. एनसीबीसीने बुधावारी कर्नाटक सरकारच्या आकड्यांचा हवाला देत याची पुष्टी केली.

न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने म्हटलं की कर्नाटक सरकारच्या आकडेवारीनुसार कर्नाटकमधल्या मुस्लिमांमधील सगळ्या जाती आणि समुदायांना राज्य सरकारने नोकरी, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिले आहे. मुस्लिमांचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

श्रेणी II ब अंतर्गत कर्नाटक राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसी ठरवण्यात आलेलं आहे. आयोगाने म्हटलं की, श्रेणी - १ मध्ये १७ मुस्लिम समुदायांना ओबीसी ठरवण्यात आलेलं आहे. तर श्रेणी २ ए मध्ये १९ मुस्लिम समुदायांना ओबीसी ठरवण्यात आलेलं आहे.

एनसीबीसीचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहीर यांनी सांगितलं की, कर्नाटक सरकारमधील नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी मुस्लिमांना आरक्षण मिळणार आहे. कर्नाटक सरकाच्या मागास कल्याण विभागाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला लिखित स्वरुपात याबाबत अवगत केलं होतं.

Muslim Reservation
Wayanad: राहुल गांधींच्या वायनाडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे लोकांना आवाहन

कर्नाटकमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १२.९२ टक्के आहे. राज्यात मुस्लिमांना धार्मिक अल्पसंख्यक मानलं जातं. २०११च्या जनगणनेनुसार कर्नाटक राज्यात मुस्लिमांची लोकसंख्या १२.३२ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Will DK Shivakumar Remain CM?
Karnataka coastal districts heavy rain alert
Karnataka High Court verdict on SC ST quota increase
Karnataka High Court strikes down key provisions of the 2022 reservation law that increased quotas for Scheduled Castes and Scheduled Tribes, citing constitutional violations and the 50% reservation limit