National Consumer Rights day 2022 : जागो ग्राहक जागो! ग्राहक म्हणून तूम्हाला या गोष्टी तोंडपाठ असायलाच हव्यात!

खरेदी विक्री व्यवहारासंबंधी काही गोष्टी माहिती नसल्याने अनेक ग्राहकांना व्यापारी लुबाडतात
National Consumer day 2022
National Consumer day 2022 Esakal

ग्राहक हा बाजारपेठेचा राजा समजला जातो. पण, महागाईच्या ओझ्याने हा राजा आता ताठ राहीला नाही. त्यात काही व्यापारीही भरमसाठ पैसे उकळून फसवणूक करतात. याच लोकांना चाप बसवण्यासाठी भारतात 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. 1986 मध्ये ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती.

जगातील प्रत्येक व्यक्ती मग तो एखाद्या देशाचा पंतप्रधान असो वा झोपडीत राहणारा व्यक्ती ग्राहक असतोच. त्यामूळे काही गोष्टी ग्राहक म्हणून तूम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.  खरेदी विक्री व्यवहारासंबंधी काही गोष्टी माहिती नसल्याने अनेक ग्राहकांना व्यापारी लुबाडतात. ग्राहक नविन असेल तर डबल किंमतीत वस्तू विकल्या जातात.

National Consumer day 2022
Bharat Jodo : कोरोनाच्या सावटात भारत जोडो यात्रा राजधानी दाखल; अभिनेते कमल हसन...

अशावेळी एक जबाबदार ग्राहक म्हणून तूम्हाला काही गोष्टी तोंडपाठच असायला हव्यात.कारण, तूमच्यासाठी नव्हे तर तूमच्या जवळच्या व्यक्तींनाही कधीकधी फसवणुकीचा सामना करावा लागतो. त्यावेळी या गोष्टी फायद्याच्या ठरतात.

लांबच्या प्रवासात अनेकदा वॉशरूम शोधावे लागते. त्यावेळी काळजी करू नका. काळजी करू नका. थेट कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता. तसेच स्वच्छतागृहाचा वापर करू शकता.

अनेकदा ग्राहकाला सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार गोळ्या, चॉकलेट देतात. पण, ते कायद्याच्या विरोधात आहे. ग्राहकाला पैसे परत मिळवण्याचा पुर्ण हक्क आहे.

National Consumer day 2022
Jaykumar Gore Accident : कठडा तोडून गाडी नदीपात्रात कोसळली; गोरेंच्या डोक्याला गंभीर दुखापत

फेअरनेस क्रिम ने गोरे होण्याचे वचन दिले असेल. आणि ती लावूनही तूम्ही गोरे झाला नाहीत. तर, दिलेले वचन न पाळल्यास कंपनीच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते.

शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता चांगली नसल्यास त्यांच्या विरोधात तूम्ही तक्रार केल्यास त्या शाळा, कॉलेजवर कडक कारवाई केली शकते.

रुग्णालयातील प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. रूग्णालय खाजगी असो वा सरकारी त्याची तूम्ही तक्रार करू शकता.

चित्रपट गृहांमध्ये खाद्य पदार्थ नेण्यास बंदी नाही. तिथे तूम्ही बाहेरूनही खाण्याचे पदार्थ नेऊ शकता.

National Consumer day 2022
Videocon Fraud : ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना 'सीबीआय'कडून अटक

ग्राहकांनी तक्रार कुठे करावी

ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या परिस्थिती मध्ये ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या 1800114000 या टोल फ्री क्रमांकावर आपल्या तक्रारी करू शकतात. ह्या क्रमांकावर आपल्या सर्वं तक्रारींचे निवारण केले जाते. ग्राहक www.nationalconsumerhelpline.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com