National Herald Case : ईडीला हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले; वक्तव्यांची पुन्हा चौकशी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Herald Case News

National Herald Case : ईडीला हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले; पुन्हा चौकशी होणार

National Herald Case News नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) ईडीला हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत. यंग इंडिया परिसराची झडती पूर्ण केल्यानंतर ईडी नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करू शकते. याशिवाय सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी केली जाणार आहे, असे ईडीच्या (ED) सूत्रांनी सांगितले. बुधवारी मोठी कारवाई करीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी यंग इंडिया लिमिटेडचे ​​नॅशनल हेराल्ड कार्यालय सील केले होते.

तपास एजन्सीला तृतीय पक्ष आणि नॅशनल हेराल्डशी (National Herald Case) संबंधित संस्थांमधील हवाला व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत, असे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तपासादरम्यान तपास एजन्सीने यंग इंडिया लिमिटेडच्या कार्यालयातून कागदोपत्री पुरावे जप्त केले. जे मुंबई आणि कोलकाता येथील हवाला ऑपरेटर्ससोबत हवाला व्यवहार दर्शवतात, असेही सूत्राने सांगितले.

हेही वाचा: नवऱ्यासाठी हव्यात तीन तीन मुली; बायकोने स्वतः दिली जाहिरात

तपास यंत्रणा राहुल गांधी (Rahul Gandhi) व सोनिया गांधी (sonia Gandhi) यांच्या वक्तव्यांची पुन्हा तपासणी करीत असल्याचेही ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. एजेएल आणि यंग इंडियन बाबतचे सर्व आर्थिक निर्णय मोतीलाल व्होरा यांनी घेतल्याच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या दाव्याशी ईडी (ED) सहमत नाही. तसेच ईडी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या स्पष्टीकरणाशी सहमत नाही की, त्यांना यंग इंडियनकडून त्यांच्या कलम २५ कंपन्यांची ॲक्ट फर्म म्हणून आर्थिक लाभ मिळाला नाही.

Web Title: National Herald Case Ed Hawala Transactions Rahul Gandhi Sonia Gandhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..