NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

NIA Deputy SP Accident News: उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे दिल्ली-लखनौ महामार्गावर एक भीषण रस्ते अपघात घडला. रात्री कटघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव मोटारसायकलने कंटेनर ट्रकला धडक दिली.
NIA Deputy SP Accident

NIA Deputy SP Accident

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील मोरादाबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा कटघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, दिल्ली-लखनौ राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकलवरून जात असताना झालेल्या एका रस्ते अपघातात राष्ट्रीय तपास संस्थेच्या एक उपअधीक्षकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेली महिला जखमी झाली. भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलची पुढे जाणाऱ्या एका कंटेनरला धडक बसल्याने हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com