राष्ट्रीय कबड्डीपटू रोहित चिल्लरला अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली- राष्ट्रीय कबड्डीपटू रोहित चिल्लर याला पोलिसांनी आज (शुक्रवार) सकाळी अटक केली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रीय कबड्डीपटू रोहित चिल्लर याला पोलिसांनी आज (शुक्रवार) सकाळी अटक केली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

रोहितची पत्नी ललिता दाबासने (वय 27) हिने सोमवारी (ता. 17) आईच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने दोन तासांच्या मोठ्या ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग करून ठेवल्या आहेत. शिवाय, चिठ्ठीही लिहून ठेवली होती. यामध्ये तिने रोहित व त्याचे आई-वडिल हुंड्यासाठी आपला छळ करत असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. ललिताच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी रोहितला अटक केली असून त्याचे वडिल पोलिसांसमोर हजर झाले आहेत.

दरम्यान, मार्च महिन्यात ललिता व रोहितचा विवाह झाला होता. काही आठवडयांपासून ती आपल्या आई-वडीलांच्या घरी रहात होती. विवाहानंतर तिने काही दिवसांतच आत्महत्या केली आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये रोहितने बंगळुरु बुल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. क्रीडाच्या कोटयातून त्याला नौदलामध्ये नोकरी मिळाली असून 2009 पासून तो सेवेत आहे.

Web Title: National Kabbadi Player Rohit Chillar Arrested