राहुल गांधींकडून 107 वर्षांच्या आजींना 'जादू की झप्पी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

दिपाली सिकंद यांनी आजीचा फोटो शेअर करत ट्विट केले आहे. दिपालीच्या ट्विटला राहुल गांधी यांनी उत्तर देत ट्विट केले, की डीअर दीपाली तुमच्या सुंदर आजीला वाढदिवसाच्या आणि ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा. त्यांना माझ्याकडून गळाभेट द्या.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबरला आपली 107 वर्षांची फॅनला जादू की झप्पी पाठविली आहे. बंगळूरमध्ये राहत असलेल्या या 107 वर्षांच्या आजीने आपल्या वाढदिवसादिवशी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बंगळूरमध्ये राहत असलेल्या दिपाली सिकंद या महिलेने ट्विटरवरून आपल्या आजीचा केक कापतानाचा फोटो शेअर केला होता. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते, की आज माझी आजी 107 वर्षांची झाली, तिला राहुल गांधी यांना भेटण्याची खूप इच्छा आहे. राहुल गांधी यांना टॅग करत हे ट्विट केले होते. दिपाली यांनी आपल्या आजीला याबाबत विचारले असता राहुल गांधी खूप हँडसम असल्याचे आजीचे म्हणणे असल्याचे तिने सांगितले आहे.

दिपाली सिकंद यांनी आजीचा फोटो शेअर करत ट्विट केले आहे. दिपालीच्या ट्विटला राहुल गांधी यांनी उत्तर देत ट्विट केले, की डीअर दीपाली तुमच्या सुंदर आजीला वाढदिवसाच्या आणि ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा. त्यांना माझ्याकडून गळाभेट द्या. राहुल गांधी यांनी माझ्या आजीला व्यक्तिगत रूपात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हिचं खरी माणूसकी आहे. खूप धन्यवाद, असे दिपालीने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Web Title: national news 107 year old women wishes to meet Rahul Gandhi