'राहुल गांधी खोटे हिंदुत्ववादी'

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांना निदान निवडणुकीच्या निमित्ताने तरी हिंदूंची आठवण आली, ही बाबदेखील काही कमी नाही. या दोघांच्या भूमिकांकडे पाहून मला आनंदच होतो.

बंगळूर : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे खोटे हिंदुत्ववादी असून, त्यांच्या दौऱ्यामुळे राज्यातील लोकांचे चांगले मनोरंजन होत असल्याची टीका केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केली आहे.

राहुल गांधींचे राज्यातील दौरे वाढल्याने लोकांना मनोरंजनाचे चांगले साधन मिळाले असून, यामुळे राज्यातील भाजप आणखी बळकट होणार आहे, असे त्यांनी उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे पत्रकारांशी बोलताना दिले. 

राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांना निदान निवडणुकीच्या निमित्ताने तरी हिंदूंची आठवण आली, ही बाबदेखील काही कमी नाही. या दोघांच्या भूमिकांकडे पाहून मला आनंदच होतो. हिंदुत्व आणि राष्ट्रवादावर केवळ बोलून भागणार नाही, तो प्रत्यक्ष कृतीत आणावा लागेल, तरच लोक तुमचा आदर ठेवतील, असेही त्यांनी नमूद केले. राहुल यांचा उत्तर कर्नाटकातील चार दिवसांचा दौरा मंगळवारी संपला. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक मंदिरे आणि मठांना भेटी दिल्या. राहुल यांचा दुसऱ्या टप्प्यातील दौरा 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 

Web Title: National news Anantkumar Hegde cricticize Rahul Gandhi