गोवा : वाळपईत शिवप्रेमींचे धरणे आंदोलन

पद्माकर केळकर
शनिवार, 3 मार्च 2018

वाळपई हातवाडा येथील  छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता वाळपई पालिकेने बेकायदेशीर ठरवित काढला होता. त्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी बैठक घेऊन शनिवार 3 मार्च रोजी वाळपई बंद पुकारला होता.

वाळपई (गोवा) : वाळपई येथे हातवाडा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपालिकेने हटविल्याचा निषेध करत शिवप्रेमींनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

वाळपई हातवाडा येथील  छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता वाळपई पालिकेने बेकायदेशीर ठरवित काढला होता. त्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी बैठक घेऊन शनिवार 3 मार्च रोजी वाळपई बंद पुकारला होता. काल शुक्रवारी पुन्हा शिप्रेमींनी बैठक घेऊन बंद तात्पुरता स्थगित केला होता. व बंद पुढे ढकलला होता.

त्याऐवजी आज शनिवारी महानिषेध रँलीचे आयोजन केले होते. पण डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यानी आदेशाव्दारे ही रँली न काढण्याचे पञ शिप्रेमींना पाठविले. त्यामुळे रॅलीही काढली नाही. त्यावरुन शिवप्रेमींनी सकाळी 10.30 वाजल्यापासुन वाळपई शहीद स्तंभाकडे धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. या धरणे आंदोलनात वाळपई नगरपालिकेचा निषेध केला जात आहे. वाळपईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, वाळपई मामलेदार राजेश आजगावकर, वाळपई पोलिस निरिक्षक शिवराम वायंगणकर, उपअधीक्षक गावडे आदी आंदोलनाच्या ठिकाणी आहेत.

Web Title: national news goa news agitation in walpai