न्या. कर्नान यांच्या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पीटीआय
गुरुवार, 8 जून 2017

कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुनावलेल्या सहा महिने कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे.

नवी दिल्ली - कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुनावलेल्या सहा महिने कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे. त्यामुळे शिक्षेतून सूट मिळवण्याचा कर्नान यांचा प्रयत्न फसला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुटीच्या न्यायालयाच्या न्या. अशोक भूषण आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने नकार दिला. ऍड. मॅथ्यूज नेदुमपरा यांनी न्या. कर्नान यांच्या वतीने बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने शिक्षा का सुनावली हे जाणून घ्यायचे असल्याचे म्हटले होते. तसेच स्थगितीच्या याचिकेवर म्हणणे एकून घेण्याची आपली विनंती आहे.

Web Title: national news india news supreme court justice karnan