काँग्रेसकडून कुमार केतकरांना राज्यसभेसाठी उमेदवारी

वृत्तसंस्था
रविवार, 11 मार्च 2018

या नावांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले असून, कुमार केतकर काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.

नवी दिल्ली : भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने संधी दिली आहे.

याशिवाय नारनभाई रथवा आणि डॉ. अमी याज्ञिक (गुजरात), धीरजप्रसाद साहू (झारखंड), डॉ. हनुमंथैया, डॉ. सय्यद नासीर हुसेन, जी. सी. चंद्रशेखर (कर्नाटक), राजमणी पटेल (मध्य प्रदेश), पोरीका बलराम नाईक (तेलंगण) आणि अभिषेक मनू सिंघवी (पश्‍चिम बंगाल) यांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहे.

या नावांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले असून, कुमार केतकर काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.

Web Title: National news Kumar Ketkar Rajya sabha candidate for Congress