महाराष्ट्राचा चित्ररथ पुन्हा ठरला अव्वल

वृत्तसंस्था
रविवार, 28 जानेवारी 2018

या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली होती. राजपथावर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे सहकुटुंब उपस्थित होते. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजे उभे राहिले आणि त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. दरम्यान, राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ सादर झाले होते.

नवी दिल्ली : 69 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. संरक्षण मत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी महाराष्ट्राच्या चित्ररथाला 2015 मध्येही प्रथम क्रमांक मिळाला होता.

national news Maharashtra Chitrarath tableaux first in Republic day parade

राजपथावर शुक्रवारी 26 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याचा देखावा केलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर येताच शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या वतीने साकारण्यात आलेल्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती. त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून, त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले होते. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवले. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले होते. चित्ररथाच्या मागील भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या आहेत. 

या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली होती. राजपथावर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे सहकुटुंब उपस्थित होते. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजे उभे राहिले आणि त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. दरम्यान, राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ सादर झाले होते. यामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान मिळविले आहे. यापूर्वी 2015 मध्ये पंढरीच्या वारीवर चित्ररथ बनविण्यात आला होता. त्यालाही प्रथम क्रमांक मिळाला होता.

Web Title: national news Maharashtra Chitrarath tableaux first in Republic day parade