मनेका गांधींकडून जनता दरबारात अधिकाऱ्याला शिवीगाळ

वृत्तसंस्था
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

'लाज वाटायला हवी. सर्व जण तुमच्याबद्दल वाईट बोलतात', असे बोलल्यानंतर मनेकांनी अधिकाऱ्याबद्दल अपशब्द वापरले. त्यांच्या वक्तव्यानंतर अधिकाऱ्यानं आक्षेप घेत तुम्ही असे बोलू नका, अशी विनंती केली.

लखनौ : केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनता दरबारातच एका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मनेका गांधी यांनी जनता दरबारमध्ये एका अधिकाऱ्यालाच शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ एएनआयने प्रसिद्ध केला. उत्तर प्रदेशातील बहेडी येथे ही घटना घडली आहे. बहेडी जिल्ह्यात जनता दरबार भरवण्यात आला होता. या दरबारात उपस्थित लोकांनी पुरवठा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावर मनेका गांधींनी संबंधित अधिकाऱ्याला झापले. इतकंच नाही तर संतापलेल्या मनेका यांनी अधिकाऱ्याला शिवीगाळही केली. 

'लाज वाटायला हवी. सर्व जण तुमच्याबद्दल वाईट बोलतात', असे बोलल्यानंतर मनेकांनी अधिकाऱ्याबद्दल अपशब्द वापरले. त्यांच्या वक्तव्यानंतर अधिकाऱ्यानं आक्षेप घेत तुम्ही असे बोलू नका, अशी विनंती केली.

Web Title: national news Maneka Gandhi rebukes and abuses an official accused of corruption