राहुल हे 'इंटरेस्टिंग', बुद्धिमान व्यक्ती: शशी थरूर

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

धर्मावर त्यांचा विश्‍वास असून ते त्याबाबत अतिशय खोल विचार करतात. ते शिवभक्त असून बौद्धांच्या विपश्‍यनेत ते सहभागी होतात. या संदर्भात आणि हिंदू तत्त्वज्ञानाबद्दल ते बोलू शकतात. मी माझ्या दोन मंत्रिपदाच्या काळात संसदेमध्ये त्यांच्या मागे बसत असे, त्यामुळे मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल हे सर्व सांगू शकतो.

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे "इंटरेस्टिंग' आणि बुद्धिमान व्यक्ती आहेत. परंतु, देशाने त्यांना पूर्णपणे ओळखलेले नाही; ही दुःखाची गोष्ट आहे, असे कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयाच्या "मुशाहिरा लिटरेचर फेस्टिवल'अंतर्गत त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना ते उत्तर देत होते. 

मुलांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांचे मत विचारले असता थरूर म्हणाले, "गांधी यांच्याकडे अनेक कल्पना, विशेष दृष्टिकोन आहे. ते ज्ञानसंपन्न पदवीधर असून, त्यांच्याकडे तरुणांना आकर्षित करणारा शब्दसंग्रह आहे. धर्मावर त्यांचा विश्‍वास असून ते त्याबाबत अतिशय खोल विचार करतात. ते शिवभक्त असून बौद्धांच्या विपश्‍यनेत ते सहभागी होतात. या संदर्भात आणि हिंदू तत्त्वज्ञानाबद्दल ते बोलू शकतात. मी माझ्या दोन मंत्रिपदाच्या काळात संसदेमध्ये त्यांच्या मागे बसत असे, त्यामुळे मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल हे सर्व सांगू शकतो.

Web Title: National news Rahul Gandhi is interesting' person says Shashi Tharoor