Collector असावा तर असा! प्रसूतीसाठी पत्नीला सरकारी रुग्णालयात दाखल करून घालून दिला आदर्श | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government Hospital

एका जिल्हाधिकाऱ्यानं आपल्या पत्नीला ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात दाखल करून एक आदर्श घालून दिलाय.

पत्नीला सरकारी रुग्णालयात दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला आदर्श

तेलंगणा : येथील एका जिल्हाधिकाऱ्यानं आपल्या पत्नीला ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात (Government Hospital) दाखल करून एक आदर्श घालून दिलाय. जिथं तिनं बुधवारी एका मुलाला जन्म दिला. अशा वेळी जेव्हा मध्यमवर्गीय लोकही सरकारी रुग्णालयात जाण्यास कचरतात, तेव्हा भद्राद्री-कोठागुडेमचे जिल्हाधिकारी अनुदीप दुरीशेट्टी (Collector Anudeep Durishetty) यांनी त्यांची गर्भवती पत्नी माधवीला आंध्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या भद्राचलम येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं.

बुधवारी सकाळी माधवीचं सी-सेक्शन ऑपरेशन झालं आणि तिनं मुलाला जन्म दिला. वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ सुर्पणानी श्रीक्रांती आणि भार्गवी यांनी भूलतज्ञ देविका यांच्या सहकार्यानं ही शस्त्रक्रिया केली. रुग्णालयाच्या वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले, आई आणि मूल दोघंही निरोगी आहेत. नवजात तज्ज्ञ डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी या बाळाची तपासणी करून आवश्यक औषधं दिली आहेत, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: धक्कादायक! शौचालयातील पाण्याचा 30 वर्षांपासून पिण्यासाठी वापर

डॉक्टर पुढे म्हणाले, आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला हैदराबादमधील कोणत्याही मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ शकला असता. पण, आपलं हॉस्पिटल कॉर्पोरेट हॉस्पिटलपेक्षा कमी नाही, हे त्यांना सिद्ध करायचं होतं. खरं तर, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी माधवी नियमितपणे आमच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करण्यासाठी येत होत्या, असं ते म्हणाले.

हेही वाचा: तालिबानच्या 44 सदस्यांची राज्यपालासह पोलिस प्रमुख पदांवर नियुक्ती

याबाबत तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी भद्राद्री-कोठागुडेमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्नीच्या प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयाची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. हरीश राव यांनी ट्विटमध्ये म्हंटलंय, मला आशा आहे की आई आणि बाळ दोघंही ठीक आहेत. मुख्यमंत्री केसीआर गरू यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्याच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांना लोकांची पहिली पसंतीय, याबाबत आम्हाला खूप अभिमान वाटतो, असंही त्यांनी नमूद केलंय. तेलंगणाच्या मेटपल्ली शहरातील (जि. जगितियाल) 2018 बॅचचे आयएएस अधिकारी दुरीशेट्टी त्या वर्षीच्या UPSC परीक्षेत भारतात प्रथम आले होते.

loading image
go to top