'NSG'च्या संकेतस्थळाचे हॅकिंग; पाकचा हात असण्याची शक्यता

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

नवी दिल्ली- पाकिस्तानशी संबंधित असलेल्या संशयित हॅकर्सनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाचे संकेतस्थळ (वेबसाईट) रविवारी हॅक केले. या संकेतस्थळाच्या 'होम पेज'वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अर्वाच्य भाषेतील संदेश आणि भारतविरोधी मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. 

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हॅकिंग झाल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाकडून www.nsg.gov.in ही संकेतस्थळाची लिंक त्वरीत बंद करण्यात आली. 'अलोन इंजेक्टर' अशी आपली ओळख या हॅकर्सने दर्शवली आहे. त्यांनी पाकिस्तान झिंदाबाद असेही 'होम पेज'वर प्रसिद्ध केले आहे. 

या संकेतस्थळाचे काम NSGच्या मानेसर येथील मुख्यालयातून करण्यात येते. त्यावरून या दलाबद्दलची प्राथमिक माहिती, त्याची सुरवात आणि मोहिमांबद्दल माहिती देण्यात येते. संकेतस्थळावरील या हॅकिंगबाबत राष्ट्रीय माहिती केंद्राला (NIC) कळविण्यात आले असून, त्याबाबत उपायात्मक कारवाई करण्यात येत आहे. 
दहशतवादविरोधी आणि चाचेगिरीविरोधात करावाया करण्यासाठी 1984 मध्ये NSG या केंद्रीय संस्थेची स्थापना करण्यात आली. NSGच्या जवानांना ब्लॅक कॅट म्हणून ओळखले जाते. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ला आणि अलीकडे झालेला पठाणकोट हल्ल्यावेळी कारवाईमध्ये NSGने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 
 
Web Title: National Security Guard site hacked, Pakistan's role possible