भाजप, काँग्रेसला टक्कर देणार स्वतंत्र महिलांचा पक्ष

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

देशात पहिल्यांदाच महिलांच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या पक्षाने येणाऱ्या 2019च्या लोकसभा निवडुकीतही आपले काही उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. 

नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच महिलांच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या पक्षाने येणाऱ्या 2019च्या लोकसभा निवडुकीतही आपले काही उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. 

या पक्षासोबत आतापर्यंत 40 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. आतापर्यंत देशभरात असणाऱ्या राजकीय पक्षात महिला आणि पुरुष हे एकत्र काम करत असतात. परंतु हा देशातील पहिला महिलांचा स्वतंत्र पक्ष असेल. या पक्षात पुरुषांना प्रवेश असणार नाही. या पक्षाची स्थापना श्वेता शेट्टी नावाच्या एका 36 वर्षीय महिला डॉक्टरांनी केली आहे. या पक्षाला राष्ट्रीय महिला पक्ष असे देण्यात आले आहे. 

या पक्षाचे मुख्य लक्ष्य हे 2019 च्या लोकसभा निवडुकीत जास्तीत जास्त खासदार ससंदेत पाठवणे असल्याचे बोलले जात आहे. ससंदेत महिलांना आरक्षण मिळवून देणे हे या पक्षाचे मुख्य काम असल्याचेही सांगण्यात आले आहे. 2012 पासूनच हा पक्ष सक्रिय राहिलेला आहे. पक्षाच्या अध्यक्षांनी अनेक महिला अधिकाऱ्यांनाही पक्षासोबत येण्यासाठी आवाहन केले आहे. दरम्यान, देशात स्वतंत्र महिलांसाठी स्थापन झालेला हा पहिलाच पक्ष असून याआधी फक्त महिला अध्यक्ष असलेले पक्ष अस्त्वित्वात होते, परंतु, पुरुषांना प्रवेशच नसणारा हा पहिलाच पक्ष आहे.

Web Title: national womens party is the only one womens party in the country will fight 2019 lok sabha election