नैसर्गिक वायूंची रेकॉर्डब्रेक दरवाढ; CNG, स्वयंपाकाचा पाईप गॅस महागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

natural-gas

नैसर्गिक वायूंची रेकॉर्डब्रेक दरवाढ; CNG, स्वयंपाकाचा पाईप गॅस महागणार

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलसह आता नैसर्गिक वायूंच्या दरात ४० टक्क्यांनी भरमसाठ वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून CNG आणि पाईपद्वारे घरांमध्ये येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या अर्थात PNG येत्या काळात मोठ्या प्रमाणावर महागण्याची शक्यता आहे. (Natural gas price hiked by 40 pc to record levels CNG piped cooking gas rates likely to go up)

नैसर्गिक वायूच्या किंमती वाढण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती. देशात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत १ ऑक्टोबर रोजी सुधारणा केली जाणार असल्याचं जाहीरही करण्यात आलं होतं. त्यानुसार, आजच्या सरकारी बैठकीत नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. एप्रिल 2019 पासून दरांमध्ये झालेली ही तिसरी वाढ आहे.

'या' घटकांच्या निर्मितीत होतो नैसर्गिक वायूचा वापर

नैसर्गिक वायूचा वापर, घरगुती पाईप गॅस, वीज निर्मिती, खत निर्मिती तसेच ऑटोमोबाईल चालवण्यासाठी लागणाऱ्या सीएनजीच्या निर्मितीसाठी होतो. त्यामुळं सहाजिकचं या सर्व घटकांच्या किंमती आता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होईल.

हेही वाचा: Shashi Tharoor: "राहुल गांधींचं 'भारत जोडो' सुरु तर काँग्रेसचे भावी अध्यक्ष 'भारत तोडो'च्या तयारीत"

PPAC चे दरवाढीचे आदेश

ONGC आणि OIL च्या जुन्या फील्डमधील गॅसची किंमत 6.1 अमेरिक डॉलरवरून 8.57/MMBtu डॉलरपर्यंत वाढली आहे. तसेच रिलायन्स-बीपीच्या गॅसच्या दरात 12.46 डॉलरपर्यंत वाढ झाली आहे, Petroleum Planning & Analysis Cell ने (PPAC) हे दरवाढीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: Sharjeel Imam : जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला जामीन मंजूर; पण रहावं लागणार तुरुंगातच!

दरम्यान, अलिकडच्या काही महिन्यांत ऊर्जेच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे, सरकारी मालकीच्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या गॅससाठी दिलेला दर सध्याच्या 6.1 डॉलरवरून 9 डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटपर्यंत वाढण्याचा विचार सरकारकडून सुरु होता. त्याचबरोबर, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्याच्या भागीदार कंपन्यांकडूनही दरवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात होती.

टॅग्स :Mumbai NewsDesh newscng