esakal | SC-ST विद्यार्थ्यांसाठी ओडिशा सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था

बोलून बातमी शोधा

Navin Patnaik}

ओडिशा सरकारने अनुसुचीत जाती-जमातीच्या (SC-ST) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

SC-ST विद्यार्थ्यांसाठी ओडिशा सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

ओडिशा सरकारने अनुसुचीत जाती-जमातीच्या (SC-ST) विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासाठी १०१ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांचे टोलेबाज भाषण; 'हा व्हायरस आहे, पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतो'

यासंदर्भात राज्य सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, ओडिशा सरकारने SC-ST विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी १०१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जणार आहे. 

'माझं होस्टेल' कार्ड लॉन्च

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तीन आकांक्षा होस्टेल आणि ६८ इतर होस्टेलचंही यावेळी उद्घाटन केलं. त्यांनी होस्टेलमध्ये राहणाऱ्या ५.७५ लाख विद्यार्थ्यांसाठी 'माझं होस्टेल' कार्ड ही योजना लॉन्च केली. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी व्हर्च्युअली याचं उद्घाटन केलं. 

'आयुष्यात खोटं बोललो नाही, बोलणार नाही'; विधिमंडळात मुख्यमंत्री गरजले!

दीड लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

ओडिशा सरकारच्या या महत्वाच्या घोषणेमुळे तब्बल दीड लाख SC-ST विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे. हे विद्यार्थी थेट आपल्या बँक खात्यात ओडिशा राज्य शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती प्राप्त करु शकतात. या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण मिळावं यासाठी सरकारने  हे महत्वाचं पाऊल उचललं आहे.