

Navjot Kaur Sidhu addressing the media after announcing her resignation from the Congress party in Punjab.
esakal
Navjot Kaur Sidhu Resigns from Congress Party : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या, "मी त्या काँग्रेस पक्षाला निरोप दिला आहे, जिथे मेहनती आणि सक्षम नेत्यांचे ऐकले जात नाही आणि जिथे वैयक्तिक हितसंबंधांवर आधारित निर्णय घेतले जातात."
तसेच, त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, त्यांच्याविरुद्ध निलंबनाची नोटीस तयार केली जात असताना, पक्षाला उघडपणे आव्हान देणाऱ्या आशु आणि चन्नी सारख्या नेत्यांवर कोणतीही कारवाई का केली गेली नाही.
काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी शनिवारी राजीनामा जाहीर केला, पंजाब पक्षाचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्यावर संघटनेचे नुकसान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आणि त्यांना आतापर्यंतचे सर्वात अक्षम आणि भ्रष्ट अध्यक्ष म्हटले.
तर याआधी मुख्यमंत्रीपदासाठी ५०० कोटीच्या टिप्पणीने राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर कौर यांना गेल्या महिन्यात काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले होते.
नवज्योत कौर या पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी आहेत. कौर यांनी अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्यावर पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाशी संगनमत करून किरकोळ फायद्यासाठी पक्षाला विकल्याचा आरोप केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.