नवज्योतसिंग सिद्धूंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासह सिद्धू पक्षाचे स्टार प्रचारक असतील. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्येही सिद्धू यांनी राहुल यांची भेट घेतली होती.

नवी दिल्ली - भाजपचे माजी नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (रविवार) काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेटू घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

पंजाबमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे. दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊऩ सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वीही सिद्धू आणि राहुल यांच्यात चर्चा झाली होती. त्यामुळे सिद्धू यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानण्यात येत होता. 

पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासह सिद्धू पक्षाचे स्टार प्रचारक असतील. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्येही सिद्धू यांनी राहुल यांची भेट घेतली होती. सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी याआधीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवू शकतात.

Web Title: Navjot Singh Sidhu joins Congress in the presence of party Vice President Rahul Gandhi