esakal | काँग्रेसला बसणार मोठा धक्का?; दिग्गज नेता सोडणार 'हात'
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसला बसणार मोठा धक्का?; दिग्गज नेता सोडणार 'हात'

- पंजाबमध्ये मोठा राजकीय भूंकप होणार. 

काँग्रेसला बसणार मोठा धक्का?; दिग्गज नेता सोडणार 'हात'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबमध्ये मोठा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील नाराज नेते नवज्योतसिंग सिद्धू हे पक्षातून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवज्योतसिंग सिद्धू यांच्या काँग्रेसमधील नाराजीवरून आता विविध पक्षांकडून त्यांच्या प्रवेशावरून दावे केले जात आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये सर्व ठिक नसले तरी आम्ही नवज्योतसिंग यांची समजूत नक्की काढू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अखेर कोरेगाव-भीमाचा तपास एनआयएकडे 

'आप'बाबत चर्चा नाही

नवज्योतसिंग सिद्धू हे आम आदमी पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यानंतर पंजाब प्रमुख भगवंत मान यांनी याबाबत वक्तव्य केले असून, सिद्धू यांच्या आप प्रवेशावर कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

सिद्धूंची नाराजी

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांचे खाते बदलले होते. त्यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविला होता. तेव्हापासून त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. 

अखेर कोरेगाव-भीमाचा तपास एनआयएकडे 

पुन्हा भाजपमध्ये जाणार?

नवज्योतिसिंग सिद्धू यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, आता त्यांची नाराजी असल्याने ते काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश करणार की, भाजपमध्ये घरवापसी करणार असे अनेक प्रश्न पंजाब राजकारणात उपस्थित होत आहे.