एअर स्टाईकमध्ये 300 दहशतवादी मेले की झाडे पाडली : सिद्धू

वृत्तसंस्था
सोमवार, 4 मार्च 2019

300 दहशतवादी मारले गेले की नाही? यामागील हेतू काय? दहशतवाद्यांना मारण्यासाठी गेला होता की झाडे उखडून फेकायला? हे फक्त निवडणुकीपूर्वीचे राजकारण आहे. भारतीय सैन्यावरून होत असलेले राजकारण बंद केले पाहिजे. जेवढा आपला देश पवित्र आहे, तेवढेच सैन्य पवित्र आहे. उँची दुकान, फीका पकवान.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी एअरस्टाईकवरून भाजपकडून होत असलेल्या राजकारणाचा समाचार घेत एअरस्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी मारले गेले की झाडे पाडली, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी लष्कराच्या पराक्रमावरून राजकारण करू नका, असा सल्लाही दिला आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 250 ते 300 दहशतवादी मारल्याचे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले होते. तर, काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही भाजपने जाहीर केलेला आकडा आला कोठून हा प्रश्न उपस्थित केला आहे. सिद्धू यांनी ट्विट करत या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे.

सिद्धू म्हणाले, की 300 दहशतवादी मारले गेले की नाही? यामागील हेतू काय? दहशतवाद्यांना मारण्यासाठी गेला होता की झाडे उखडून फेकायला? हे फक्त निवडणुकीपूर्वीचे राजकारण आहे. भारतीय सैन्यावरून होत असलेले राजकारण बंद केले पाहिजे. जेवढा आपला देश पवित्र आहे, तेवढेच सैन्य पवित्र आहे. उँची दुकान, फीका पकवान.

Web Title: Navjot Singh Sidhu tweet on army air strike congress bjp politics