नवज्योतसिंग सिद्धू घेणार भगवंत मान यांची भेट; कौतुकासह केली होती टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navjyot Singh Sidhu will meet Bhagwant Mann

नवज्योतसिंग सिद्धू घेणार भगवंत मान यांची भेट; कौतुकासह केली होती टीका

काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू यांनी रविवारी जाहीर केले की ते सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांची राज्याच्या आर्थिक पुनरुज्जीवनाबाबत चर्चा करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राज्य काँग्रेसचे नेतृत्व करणारे सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांना पायउतार व्हावे लागले. (Navjyot Singh Sidhu will meet Bhagwant Mann)

नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विट केले की, ‘पंजाबच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाच्या (Revival) मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या सायंकाळी ५.१५ वाजता चंदीगडमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांची भेट घेणार आहोत. पंजाबचे पुनरुज्जीवन केवळ प्रामाणिक सामूहिक प्रयत्नानेच शक्य आहे.’ काँग्रेसच्या पराभवानंतर नवज्योत सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनीही भगवंत मान यांच्या झटपट कारभारावर कौतुकासह टीका केली. गेल्या महिन्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या बॉसचे तोंडपीस असल्याचा आरोप करीत त्यांना रबराची बाहुली संबोधले होते.

तसेच दोन दिवसांनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रामाणिक व्यक्ती असे संबोधले होते. ते पक्षाच्या वरती उठून राज्यातील माफियांचा सामना करण्याच्या कोणत्याही हालचालीत भगवंत मान (Bhagwant Mann) यांना पाठिंबा देतील, असे म्हटले होते. ‘सत्तेत परत येण्यासाठी काँग्रेसला नवा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. नैतिक अधिकार आणि सचोटीने प्रामाणिक चेहरे समोर आणावे लागतील. आम्ही या महान राज्याच्या अस्तित्वासाठी लढत आहे’ असेही सिद्धू म्हणाले होते.

काँग्रेसमध्ये (Congress) येण्यापूर्वी काही काळ आम आदमी पक्षाशी चर्चा सुरू असलेल्या सिद्धू यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंजाबमधील जनतेचे अभिनंदन केले होते. काँग्रेस अध्यक्ष या नात्याने ते असे कसे म्हणू शकतात, असे विचारले असता ते म्हणाले की, लोकांनी बदलाला निवडून दिले आहे आणि ते कधीही चुकीचे नसतात. जेव्हा एखाद्याचे ध्येय उच्च असते आणि पंजाबवर प्रेम असते तेव्हा त्याला विजय किंवा पराभवाची पर्वा नसते, असेही सिद्धू (Navjyot Singh Sidhu) म्हणाले होते.

टॅग्स :PunjabBhagwant Mann