मंत्र्यांच्या मुलावर बलात्कार, गर्भपाताचा आरोप; जिवाला धोका असल्याची तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allegations of atrocities against ministers son

मंत्र्यांच्या मुलावर बलात्काराचा आरोप; जिवाला धोका असल्याची तक्रार

राजस्थानमध्ये आमदार जोहरीलाल यांच्या मुलावर बलात्काराचा (Allegations) आरोप झाल्यानंतर आता जलसंपदा मंत्री महेश जोशी यांच्या मुलावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. जयपूरच्या पीडितेने मंत्र्याचा मुलगा रोहित जोशी याने दारू पाजून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. गर्भवती राहिल्यावर गर्भपात (Abortion) केल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणी उत्तर दिल्लीतील सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Allegations of atrocities against ministers son)

रोहितसोबत फेसबुकवर मैत्री झाली. रोहितने ८ जानेवारी २०२१ रोजी सवाई माधोपूर येथील मित्राच्या घरी नेले. तिथे दारू पाजून रोहितने बलात्कार केला. बेशुद्ध असताना नग्न व्हिडिओ आणि फोटो काढले, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. तक्रारीवरून उत्तर दिल्ली पोलिसांनी झिरो नंबर एफआयआर नोंदवून सवाई माधोपूर एसपीकडे पाठवला आहे.

यानंतर २० एप्रिल २०२१ रोजी रोहित मला मित्र मुस्कानच्या फार्म हाउसवर घेऊन गेला. तिथे माझ्या मांगेत कुंकू भरून पत्नी झाल्याचे सांगितले. यानंतर रोहितने लवकरच स्वागतसमारंभ करणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर २६ जून २०२१ रोजी मला मनाली येथे घेऊन गेला. ११ ऑगस्ट २०२१ रोजी मी गरोदर राहिली. याबाबत रोहितला सांगितले असता भांडण झाले. मला जबरदस्ती गर्भपात (Abortion) करण्यास भाग पाडले. यानंतर ३ ते ४ सप्टेंबर रोजी दिल्लीतील हॉटेल सम्राटमध्ये पुन्हा बलात्कार केला. यानंतर १७ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा बलात्कार (Allegations) केला, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये माझ्या जिवाला धोका

राजस्थानमध्ये माझ्या जिवाला धोका आहे. त्यामुळे उत्तर दिल्लीतील सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजस्थानमध्ये हे लोक तक्रारही नोंदवू देत नाहीत. उत्तर दिल्ली पोलिसांनी ही तक्रार सवाईमोधपूर एसपीकडे पाठवली आहे. कारण, तक्रारीनुसार ८ जानेवारी २०२१ रोजी सवाई माधोपूरमध्येच बलात्कार झाला होता.