हनुमान चालीसा वाद : ... हा राजद्रोह कसा? जावडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Javadekar
हनुमान चालीसा वाद : ... हा राजद्रोह कसा? जावडेकर

हनुमान चालीसा वाद : ... हा राजद्रोह कसा? जावडेकर

नवी दिल्ली - मुळातच जनादेशाच्या विरोधात जाऊन व अनैतिक पायावर उभारलेल्या आणि त्याच पध्दतीन राज्याच्या सत्तेवर कायम असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या राजवटीत हनुमान चालीसा म्हणण्याचे नुसते ठरविणे व तसे जाहीर करणे हा राजद्रोह होतो हे विचित्र व आक्रीत आहे असे टीकास्त्र भारतीय जनता पक्षाने सोडले आहे. या आघाडी सरकारची गेल्या अडीच वर्षाची कमाई काय.. तर बेहिशोबी लूट व लूट हेच सांगता येईल असे ज्येष्ठ भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यानी हनुमान चालीसा चे पठण करण्याची घोषणा केली त्यानंतर त्यांना मुंबईत अटक करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी राज्य सरकारला घेरले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आपला निम्मा म्हणजे अडीच वर्षांचा जो कार्यकाळ पूर्ण केला आहे त्याचा राज्याच्या जनतेला हे काय हिशोब देतील असा सवाल करून जावडेकर यांनी सकाळ शी बोलताना टीका केली की राज्यातील बारा कोटी जनतेच्या एकाही समस्येवर, प्रश्नावर या सरकारने समाधानकारक उत्तर शोधलेले नाही. अनेक विषयांचा या सरकारच्या काळात विचकाच झाला. मराठा आरक्षण अ्सो, धनगर आरक्षण असो, शेतकरी आत्महत्या असो.. असे अनेक मुद्दे आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या (एस टी) कर्मचाऱ्यांचा संप तर राज्य सरकारने फारच अयोग्य पद्धतीने हाताळला. या संपामुळे लाखो प्रवाशांचे महिनोंमहिने हाल झाले त्यावर उपाय काढता नाही आला. प्रगतीचे विकाासाचे काम ठळकपमे दाखवावे असे काहीच या सरकारच्या खात्यावर जनतेला दिसलेच नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे फोटो लावून २०१९ मध्ये सिवसेनेचे आमदार निवडून आले. जनतेने भाजप-सेनेला बहुमत दिले. पण शिवसेनेने गद्दारी करून मोदीच नव्हे तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्याही विरोधकांशी बिनदिक्कत हातमिळवणी केली. ज्या सत्तेचा पाया असा असतो ती सत्ता जनतेच्या अपेक्षा कधीही पूर्ण शकत नाही. या सरकारच्या काळात कोणते लोक वर आले तर १५ वर्षए निलंबित असलेला सचिन वाझेसारखा माणूस पोलिसांच्या गुन्हेगारी विभागाचा प्रमुख होतो, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबईतून परागंदा होण्याची वेळ आली, राज्याचे गृहमंत्री व अल्पसंख्यांक मंत्री तुरूंगात गेले ाहेत. यातही मलिक यांच्यावर ५००० पानांचे आरोपपत्र दाखल होऊनही ते खुर्चीवर घट्ट आहेत. अशा सरकारला कोणत्या नैतिकतेच्या परिभाषेत बसवणार...या राजवटीत मंत्री व सत्तारूढ नेत्यांच्या नातवाईकांचीच फक्त चांदी होत आहे.

जावडेकर म्हणाले की केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारी व तपासाबद्दल आरोप करणारांना एकच प्रश्न मला विचारायचा आहे की जे प्रमाणिकपणे कर भरतात, पगारदार व सचोटीचे उद्योजक, व्यापारी आहेत त्यांच्यावर छापे पडले का... नाही ना. मग जे मूळ आरोप आहेत त्याबद्दल कोणी बोलत नाही. बाळासाहेबांनी ज्या भावनेने शिवसेना वाढवली त्या भावनेला मूठमाती देऊन व त्यांच्या हिंदुत्वालाही गुंडाळून टेवून सत्तेवर कायम असलेल्या या सरकारचा - चला लुटू या, हाच एककलमी कार्यक्रम राज्यात सुरू आहे व मराठी जनतेला सारे काही समजत आहे असेही जावडेकर म्हणाले.

Web Title: Navneet Rana Ravi Rana Case It Strange To Decide To Say Hanuman Chalisa Treason Bjp Prakash Javadekar Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top