esakal | पवार-मोदी भेटीबाबात संभ्रम नको; नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

पवार-मोदी भेटीबाबात संभ्रम नको; नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण

पवार-मोदी भेटीबाबात संभ्रम नको; नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाली आहे. ते जवळपास 1 तासाहून अधिक काळ या बैठकीत होते. शरद पवार यांनी काल शुक्रवारी पियुष गोयल यांच्याशी भेट घेतली होती. त्यानंतर ते राजनाथ सिंह यांनाही भेटले होते. आणि आता ही नरेंद्र मोदींची भेट त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलंय.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींबरोबर राष्ट्रीय हिताच्या मुद्यांवर चर्चा - शरद पवार

नवाब मलिक म्हणाले की, पीयुष गोयल यांची राज्यसभेचा नेता म्हणून भाजपने घोषणा केल्यानंतर काल शुक्रवारी गोयल यांनी स्वत:हून शरद पवार यांची भेट घेतली. नेता बनल्यानंतर एक कर्टसी कॉल म्हणून पवारांची भेट घेतली. नेहमीप्रमाणे, परंपरेनुसार, सदनाचा नेता म्हणून सहकार्य मागण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यानुसारच ही भेट झाली होती.

सोबतच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या ऑफिसमध्ये एक बैठक झाली ज्यामध्ये पवार साहेब, माजी संरक्षण मंत्री काँग्रेसचे नेते ए के अँटोनी त्या बैठकीला होते. त्याच बैठकीला चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपीन रावत देखील उपस्थित होते. या बैठकीत सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा झाली. माहिती दिली गेली. त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

हेही वाचा: लोकसभा 2024च्या तोंडावर राम मंदिराचा गाभारा होणारा दर्शनासाठी खुला

त्यानंतर आज शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्या बैठकीत कोओपरेटीव्ह बँकासंदर्भात केंद्र सरकारने जो कायदा केलाय त्यासंदर्भात चर्चा झाली. या कायद्यान्वये बँकाचे अधिकार कमी होऊन आरबीआयचे अधिकार वाढले आहेत. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

पुढे ते म्हणाले की, याबाबत आधी फोनवर चर्चा केली होती. मात्र, प्रत्यक्ष बसून चर्चा होण्याची अपेक्षा होती. आज ती भेट झाली. सोबतच कोरोनाच्या संदर्भात काल पंतप्रधांनी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. वेगवेगळ्या राज्यातील सरकारे आपापल्या पद्धतीने कोरोनाचे नियम बनवत असताना विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे. त्यामुळे, एक नॅशनल पॉलिसी बनवली जावी, अशी मागणी केली जात होती. जर अशी एक पॉलिसी बनवली गेली तर कोरोना काळातील राजकारण कमी होऊ शकते. यासंदर्भातच पवार साहेबांनी मोदींशी चर्चा केली. या मीटिंगनंतर गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले गेले. विरोधक पवारांना भेटले म्हणून गैरसमज पसरवले जात असून ते चुकीचे आहेत. हे सगळा घटनाक्रम काँग्रेसच्या माहितीत झाला आहे. ही मीटिंग अचानक झालेली नाही. ही भेट पूर्वनियोजित होती. शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांसोबत कोणतीही बैठक झालेली नाहीये.

loading image