esakal | पंतप्रधनांच्या आवाहनावर नवाब मलिकांनी केली 'ही' मागणी; म्हणाले...

बोलून बातमी शोधा

modi-malik

पंतप्रधनांच्या आवाहनावर नवाब मलिकांनी केली 'ही' मागणी; म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असल्याचं राज्यांना सांगितलं. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिक्रिया देताना राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्याकडे एक महत्वाची मागणी केली.

मलिक म्हणाले, "पंतप्रधान म्हणाले की लॉकडाउन हा राज्यांसाठी शेवटचा पर्याय असायला हवा. पण देशातील विविध कोर्टांनी राज्यांना लॉकडाउन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर स्थलांतरीत कामगारांनी गावाची वाट पकडली असून त्यांना, गरीबांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना पंतप्रधान आपल्यासाठी दिलासा देणारं पॅकेज जाहीर करतील अशी आशा आहे."

हेही वाचा: ...तर कामगार वर्गाचं वेगानं लसीकरण होईल - पंतप्रधान

जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, "आजच्या स्थितीत आपल्याला देशाला लॉकडाउनपासून वाचवायचं आहे. मी राज्यांना आवाहन करतो की त्यांनी लॉकडाउनला अंतिम पर्याय म्हणूनच निवडावा. लॉकडाउनपासून वाचण्याचा आपल्याला मोठा प्रयत्न करायचा असून मायक्रो कन्टेन्मेंट झोनवरच ध्यान केंद्रीत करायचं आहे. आपण आपल्या अर्थव्यवस्थेची प्रकृती सुधारु तसेच देशवासियांच्या प्रकृतीचीही काळजी घेऊ."

हेही वाचा: दिल्लीत ऑक्सिजनची आणीबाणी; रुग्णालयांमध्ये काही तासांपुरताच साठा शिल्लक

"आपला सर्वांचा प्रयत्न लोकांचा जीव वाचवणं हा आहेच पण हे काम करतानाच आर्थिक घडामोडी आणि लोकांच्या उपजीविकांना कमीत कमी फटका बसेल याचीही काळजी घेतली जात आहे. अठरा वर्षांवरील सर्वांना आता लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे याचा फायदा शहरांमधील जो कामगार वर्ग आहे, त्यांनाही मिळणार आहे. या कामगार वर्गाचंही वेगानं लसीकरण केलं जाईल. राज्ये आणि केंद्राच्या प्रयत्नांनी या कामगारांना लस मिळेल. त्यामुळे माझं राज्य सरकारांना आग्रह आहे की, त्यांनी कामगारांचा विश्वास टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांना आवाहन करावं की ते जिथे आहेत तिथंच त्यांनी रहावं. राज्यांनी दिलेला हा विश्वास त्यांची खूप मदत करेन ते ज्या शहरात आहेत तिथेच त्यांना पुढील काही दिवसांत लस मिळेल आणि त्यांचं कामही बंद होणार नाही," असंही मोदी यावेळी म्हणाले.