esakal | ...तर कामगार वर्गाचं वेगानं लसीकरण होईल - पंतप्रधान

बोलून बातमी शोधा

Pm Modi
...तर कामगार वर्गाचं वेगानं लसीकरण होईल - पंतप्रधान
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून यामुळे सर्वत्र रुग्णालयं रुग्णांनी भरुन गेली आहेत. विविध राज्यांनी ही लाट थोपवण्यासाठी लॉकडाउनच्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता कामगार वर्गही गोंधळला असून आपल्या गावांकडे जाण्यासाठी रेल्वे-बस स्थानकांमध्ये गर्दी करायला लागला आहे. यापार्श्वभूमीवर पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगार वर्गाला स्थालंतर न करण्याचं आवाहन करताना त्यांना वेगानं लस मिळेल तसेच त्यांचा रोजगारही टिकून राहिल याची खात्री देण्याचा प्रयत्न केला. याची जबाबदारी त्यांनी राज्यांवर टाकली आहे. देशाला संबोधित करताना मोदींनी मंगळवारी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

हेही वाचा: दिल्लीत ऑक्सिजनची आणीबाणी; रुग्णालयांमध्ये काही तासांपुरताच साठा शिल्लक

मोदी म्हणाले, "आपला सर्वांचा प्रयत्न लोकांचा जीव वाचवणं हा आहेच पण हे काम करतानाच आर्थिक घडामोडी आणि लोकांच्या उपजीविकांना कमीत कमी फटका बसेल याचीही काळजी घेतली जात आहे. अठरा वर्षांवरील सर्वांना आता लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे याचा फायदा शहरांमधील जो कामगार वर्ग आहे, त्यांनाही मिळणार आहे. या कामगार वर्गाचंही वेगानं लसीकरण केलं जाईल. राज्ये आणि केंद्राच्या प्रयत्नांनी या कामगारांना लस मिळेल. त्यामुळे माझं राज्य सरकारांना आग्रह आहे की, त्यांनी कामगारांचा विश्वास टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांना आवाहन करावं की ते जिथे आहेत तिथंच त्यांनी रहावं. राज्यांनी दिलेला हा विश्वास त्यांची खूप मदत करेन ते ज्या शहरात आहेत तिथेच त्यांना पुढील काही दिवसांत लस मिळेल आणि त्यांचं कामही बंद होणार नाही."

हेही वाचा: "सध्या देशसेवेची संधी द्या, नंतर पुन्हा निलंबित करा"; डॉ. काफिल खान यांचं मुख्यमंत्री योगींना पत्र

गेल्यावर्षी जी परिस्थिती होती ती आजपेक्षा खूपच वेगळी होती. तेव्हा आपल्याजवळ या जागतिक महामारीशी लढण्यासाठी खास वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी कोरोनाच्या चाचण्यांसाठी पुरेशा लॅब नव्हत्या. पीपीई कीटचं काहीही उत्पादनं नव्हतं. या आजारावरील उपचारांसाठी आपल्याकडे काही विशेष माहितीही नव्हती. तरीही खूपच कमी कालावधीत आपण या गोष्टींमध्ये सुधारणा केल्या. आज आपल्या डॉक्टरांनी कोरोनावर उपाचारांची चांगलं कौशल्य मिळवलं आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.