esakal | दिल्लीत ऑक्सिजनची आणीबाणी; रुग्णालयांमध्ये काही तासांपुरताच साठा शिल्लक

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal
दिल्लीत ऑक्सिजनची आणीबाणी; रुग्णालयांमध्ये काही तासांपुरताच साठा शिल्लक
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ऑक्सिजनची आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. काही रुग्णालयांमध्ये केवळ काही तासांचाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने दिल्लीला ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा: "सध्या देशसेवेची संधी द्या, नंतर पुन्हा निलंबित करा"; डॉ. काफिल खान यांचं मुख्यमंत्री योगींना पत्र

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटलं होतं की, "दिल्लीतील बहुतेक रुग्णालयांमधील ऑक्सिजन ८ ते १२ तासांमध्ये संपून जाईन. ज्या रुग्णालयांमध्ये ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे त्या रुग्णालयांची नावेही त्यांनी ट्विट करुन जाहीर केली होती.

हेही वाचा: लष्कराच्या वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी खुल्या करा; राजनाथ सिंह यांचे निर्देश

दरम्यान, केंद्रानं आज दिल्ली हायकोर्टात सांगितलं की, देशाच्या राजधानीला ऑक्सिजन पुरवठ्यात कुठलाही खंड पडलेला नाही. त्याचबरोबर दिल्लीतील सरकारी रुग्णालयांना १३९० व्हेंटीलेटर्स पुरवण्यात आले आहेत. तसेच पीएम केअर फंडाच्या माध्यमातून दिल्लीत ८ ऑक्सिजन उत्पादनं करणारे प्रकल्प सुरु करण्याची सरकारची योजना आहे. रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सध्या उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठाही थांबवण्यात आला असल्याचंही केंद्रानं कोर्टात सांगितलं.

हेही वाचा: कोरोनाचा कहर : नेट परीक्षाही ढकलली पुढे; एनटीएची घोषणा

दिल्लीत कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाल्याने संसर्गाची चेन तोडण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी २६ एप्रिलपर्यंत सहा दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला आहे.