

कर्नाटक मधील एका युवकास २०१२ साली नक्षलवादी असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती. तेव्हा हा २३ वर्षीय युवक पत्रकारितेचे शिक्षण घेत होता. पोलिसांना नक्षली असल्याचे पुरावे सादर न करता आल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. कर्नाटक मधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ३२ वर्षीय वित्ताला माले कुडिया आणि त्याचे वडील लिंगप्पा माले कुडिया यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक केली होती. मात्र, त्यासाठी कोर्टात देण्यात आलेले पुरावे एका पुस्तकाचे होते. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या युवकाच्या हॉस्टेलमधील रुममध्ये पोलिसांना शहीद भगत सिंगांवर आधारित पुस्तकं आढळली होती. याच आधारवर त्याच्यावर नक्षलवादाशी संबंधीत असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून हे पुस्तकं सादर केले होते. या पुस्तकामध्ये लिहले होते की, जर गावांमध्ये सर्व नागरिकांना आपल्या सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार घातला पाहिजे. तसेच, काही वर्तमानपत्राचे लेखही पोलिसांनी जप्त केले होते.
त्यानंतर युवकासह त्याच्या वडिलांवर नक्षलवाद्यांना मदत करत असल्याच्या आरोपाखाली ३ मार्च २०१२ साली देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. यांसदर्भात जिल्हा सत्र न्यायालयाने सांगितले की, पुस्तकं आणि वर्तमान पत्राचे लेख वाचण्यास कोणताही कायदा त्यांना थांबवू शकत नाही. त्यामुळे त्यांना नक्षलवादी ठरवण्यासाठी हे पुरावे प्रबळ ठरत नसल्याचे सांगून त्यांची निर्दोष मुक्तता केली.
"मला आनंद वाटत आहे की ९ वर्ष संघर्ष केला. आम्हाला नक्षलवादी ठरवले गेले होते, मात्र पोलीस यासाठीचे सबळ पुरावे कोर्टापुढे सादर करू शकले नाही," असे वित्तालाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.