Bihar Election:निवडणुकीत घातपाताचा नक्षलवाद्यांचा कट; बड्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव

टीम ई-सकाळ
Tuesday, 20 October 2020

देशातील बडे नेते बिहारला भेट देताना, त्यांच्या आईडी किंवा लँड माईंडने स्फोट घडवून हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा इरादा आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांमध्ये घातपात घडवण्याचा कट रचला आहे. 

पाटणा Bihar election 2020 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा धुरळा उडत आहे. देशभरातील नेते प्रचाराच्या निमित्ताने बिहारमध्ये दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांनी बड्या नेत्यांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने तयारी केल्याची माहिती आहे. झी न्यूजने गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने याबाबत विशेष बातमी प्रसिद्ध केली आहे. 

आणखी वाचा - खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मूहूर्त ठरला

नक्षलवाद्यांनी बिहारची निवडणूक उधळवून लावण्याची तयारी केल्याची बातमी आहे. निवडणूक प्रचारात बड्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा त्यांचा इरादा आहे. देशातील बडे नेते बिहारला भेट देताना, त्यांच्या आईडी किंवा लँड माईंडने स्फोट घडवून हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा इरादा आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांमध्ये घातपात घडवण्याचा तसेच, सुरक्षा दलांच्या ताफ्यावर किंवा नागरी वस्तीत घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा इरादा आहे. गुप्तचर संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहारच्या निवडणुकीत व्हीव्हीआयपी नेत्यांच्या जिवाला धोका आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालात कोणत्याही नेत्याचे नाव घेण्यात आलेले नाही. परंतु, दक्षता म्हणून बिहार आणि झारखंडच्या परिसरातील नक्षलग्रस्त भागातील हालचालींवर गेल्या काही दिवसांपासून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. 

आणखी वाचा - सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याचा शरद पवारांचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

बिहारमधील जमुई, गया आणि औरंगबाद जिल्ह्यातील नलक्षलग्रस्त भागात संशयितांवर विशेष पाळत ठेवण्यात येत आहे. निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होणार असून, पहिला टप्पा 28 ऑक्टोबर दुसरा 3 नोव्हेंबर तर, तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रातील बडे मंत्री बिहारमध्ये दाखल होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naxals planning target top leaders bihar election intelligence report