राज्यांकडून ‘एनसीबी’कडे मोठी प्रकरणे हस्तांतरीत

मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि इतर काही राज्यांनी अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध असलेली काही मोठी प्रकरणे ‘एनसीबी’कडे तपासासाठी दिली आहेत.
राज्यांकडून ‘एनसीबी’कडे मोठी प्रकरणे हस्तांतरीत

नवी दिल्ली : अंमली पदार्थ तस्करीचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने तपास करण्यासाठी विविध राज्य सरकारांनी आतापर्यंत २५ मोठी प्रकरणे अमलीपदार्थ नियंत्रण विभागाकडे (NCB) सोपविली असल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणांच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी ‘एनसीबी’ने अधिकाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त केले आहे.

मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि इतर काही राज्यांनी अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध असलेली काही मोठी प्रकरणे ‘एनसीबी’कडे तपासासाठी दिली आहेत. या प्रकरणांमागील आंतरराज्य टोळी किंवा आंतरराष्ट्रीय धागेदोरे उलगडावे, आरोपींना अटक व्हावी आणि त्यांना न्यायालयामार्फत शिक्षा व्हावी, यासाठी या प्रकरणांचे हस्तांतर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी साधारणे २५ ते ३० प्रकरणे ‘एनसीबी’कडे तपासासाठी येण्याची शक्यता असून त्यासाठी राज्यांशी चर्चा सुरु असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

एनसीबी’चे महासंचालक सत्यनारायण प्रधान यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विविध राज्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवत, न सुटलेली आणि व्याप्ती असलेली प्रकरणे हस्तांतरीत करण्याचा विचार व्हावा, अशी विनंती केली होती. त्या पत्रामुळेच राज्यांकडून अशी प्रकरणे ‘एनसीबी’कडे येण्यास सुरुवात झाल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com