New books to have Bharat instead of India : भारत आणि इंडिया या दोन्ही शब्दांवरुन गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळया प्रकारे चर्चा सुरु आहे. यापुढील काळात इंडिया हे नाव हद्दपार करत त्या जागी भारत हे नाव वापरण्याचा आग्रह केंद्र शासन पातळीवरुन केला जाणार आहे. त्याची अंमलबजावणीही तातडीनं होत असल्याचे दिसून आले आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात एनसीआरटीकडे देखील त्यांच्या अभ्यासक्रमातून, पाठ्यपुस्तकातून इंडिया शब्द हटवून त्याजागी भारत शब्द घेण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. इंडिया टुडेनं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?
त्या मागणीनुसार येत्या दिवसांत एनसीईआरटीच्या पुस्तकातून इंडिया शब्द हद्दपार होऊन त्याऐवजी भारत शब्द येणार आहे. एनसीईआरटीच्या पॅनलनं आता भारत शब्द स्विकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे येत्या काळात संबंधित संस्थेकडून जी पुस्तकं येतील त्यात इंडियाऐवजी भारत हा उल्लेख असणार आहे. अशी माहिती त्या पॅनलमधील एका सदस्यानं दिली आहे.
नाव बदलण्याच्या मागणीचे निवेदन हे गेल्या काही महिन्यांपूर्वी केली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. संस्थेकडून इंडिया हे नाव वगळून भारत हा शब्द वापरण्यात येईल का याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. त्यावरुन सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांकडून अनेक मतमतांतरं समोर आली होती. जी २० च्या वेळेस देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला उल्लेख प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा न करता प्रेसिडेंट ऑफ भारत असा केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.