Operation Sindoor in NCERT Curriculumesakal
देश
Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...
Operation Sindoor in NCERT Curriculum : NCERT च्या अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरवर दोन मॉड्यूल्स शिकवली जाणार आहेत. यापैकी पहिले मॉड्यूल इयत्ता ३ ते ८ च्या विद्यार्थ्यांना तर, दुसरे मॉड्यूल इयत्ता ९ ते १२ विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.
NCERT introduces Operation Sindoor modules in school curriculum : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार आता इयत्ता ३ ते १२ च्या विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराची शौर्यगाथा शिकवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नसून शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे वचन असल्याचे या मॉड्यूलमध्ये सांगण्यात आले आहे.
