
एनसीईआरटीने इयत्ता ७वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात मोठे बदल केले आहेत. नवीन पुस्तकांतून मुघल आणि दिल्ली सल्तनतशी संबंधित धडे काढून टाकण्यात आली आहेत आणि त्यांच्या जागी प्राचीन राजवंश, पवित्र भूगोल तसेच मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या सरकारी योजनांशी संबंधित नवीन प्रकरणे जोडण्यात आली आहेत. हे बदल नवीन शिक्षण धोरण (NEP) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCFSE) २०२३ नुसार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये भारताच्या परंपरा, ज्ञान प्रणाली आणि स्थानिक संदर्भांना प्राधान्य देण्याचे म्हटले आहे.