esakal | "राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधांत सूट नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope

"राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधांत सूट नाही"

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : देशाच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर हा महाराष्ट्रात खूपच कमी असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. असं असलं तरी राज्यात कोरोनाच्या निर्बंधांमध्ये कुठलीही सूट देण्याचा निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (maharashtra corona infection rate low as country no exemption in restrictions aau85)

हेही वाचा: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ

टोपे म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून राज्यातील कोरोना संसर्गाची संख्या ही सात ते नऊ हजारांच्या दरम्यान राहत आहे. त्यामुळे आपला कोरोना संसर्गवाढीचा दर देशाच्या तुलनेत खूप कमी आहे. सध्या सुमारे १ लाख ४ हजार रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यातील ९२ टक्के रुग्ण दहा जिल्ह्यांमध्ये आहेत, हे दहा जिल्हे वगळता इतर २६ जिल्ह्यांमध्ये साधारण ८ टक्के रुग्ण आहेत."

निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय नाही

संपूर्ण राज्याला आपण कोरोना संसर्गाच्या वर्गवारील 'लेव्हल-३' मध्ये आणलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांमध्ये कुठलीही सूट देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री याचा सातत्याने आढावा घेत आहेत, असंही टोपे यांनी यावेळी सांगितंल.

हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ

त्याचबरोबर मुंबईत विमानाने दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ४८ तास आगोदरचं RT-PCR चाचणीचं प्रमाणपत्र आवश्यक होतं. ते आता रद्द करुन जर त्या व्यक्तीनं दोन डोस घेतल्याचे प्रमाणित पुरावे असतील तर त्याला महाराष्ट्रात प्रवेश देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर दुकानंदारांची देखील मागणी होती की, त्यांनी जर दोन डोस घेतले असतील तर त्यांना अधिकवेळ दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशा काही मागण्यांवरही मुख्यमंत्री येत्या काळात निर्णय घेतील.

जगातील काही देशात तिसरी लाट पहायला मिळतेय

जगात युके, स्पेन, इंडोनेशिया या देशांमध्ये तिसरी लाट आपल्याला प्रकर्षानं पहायला मिळतं आहे. दरम्यान, अधिकाधिक लस मिळावी यासाठी राज्यानं प्रयत्न करायला हवेत अशी चर्चा सुरु आहे. त्याअनुषंगानं राज्यात उत्पादकांकडून २५ टक्के कोट्याची जास्तीत जास्त लस राज्याला उपलब्ध होईल याकडे लक्ष केंद्रीत करावं असं मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं असल्याचं टोपे यांनी सांगितलं. लोकसंख्येच्या आधारावर जुलैअखेरपर्यंत केंद्राकडून आपल्याला लस मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ४२ कोटी जी देशासाठी लस आहे त्यातील दहा टक्के लोकसंख्या राज्याची आहे.

loading image