esakal | सत्तास्थापनेसाठी आता केंद्र दिल्ली; सोनिया गांधी-शरद पवार यांच्यात चर्चा 
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi, Sharad Pawar

शरद पवार यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर समितीतील नेत्यांची बैठक  घेतली. त्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले असून, राज्यातील सत्तास्थापनेवर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष असून, यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

सत्तास्थापनेसाठी आता केंद्र दिल्ली; सोनिया गांधी-शरद पवार यांच्यात चर्चा 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज (सोमवार) दिल्लीत भेट होणार असून, राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला असून, आता सत्तास्थापनेचा केंद्र दिल्ली असणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप यांच्यात ताणाताणी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असून, या पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली होती. या वेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे नेते अहमद पटेल, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव वेणुगोपाल मुंबईत आले होते. त्यांनी पवार यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून शिवसेनेसोबत पुढील चर्चा करण्याचे सूचित केले होते. या अनुषंगाने सत्ता स्थापन करण्यासाठी तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांत सामाईक समान कार्यक्रम ठरविण्यासाठी मुंबईत बैठका झाल्या. या बैठकांत निश्‍चित केलेला अहवाल सोनिया गांधी यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात येणार आहे.

पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

शरद पवार यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर समितीतील नेत्यांची बैठक  घेतली. त्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले असून, राज्यातील सत्तास्थापनेवर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष असून, यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर

उद्धव-सोनिया भेट 
राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवी आघाडी उदयास आली आहे. या अनुषंगाने काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून सभाषण झाल्याचे समजते. सोनिया गांधी यांच्याशी ठाकरे यांची अद्याप चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता उद्धव ठाकरे हे लवकरच नवी दिल्लीला जाणार असल्याचेही शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.