शरद पवार-सोनिया गांधी यांच्यात प्रदीर्घ चर्चा; अजित पवारही दिल्लीत दाखल?

टीम ई-सकाळ
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

आज, सकाळी शरद पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न मीडियाने केला होता. त्यावेळी पवार यांनी सत्ता स्थापनेबद्दल शिवसेनेला विचारा, असे सांगून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी झिडकारले होते.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या नव्या समीकरणाची गणितं जुळवण्यासाठी दिल्लीत सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातील चर्चेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पूरग्रस्तांच्या मदतीवरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटे चर्चा 
गेल्या आठवडभरापासून शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात महत्त्वाची चर्चा होणार असल्याचे बोलले जात होते. या बैठकीनंतरच महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकवेळा स्पष्ट केले. आज, सायंकाळी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर शरद पवार मीडियाशी न बोलता निवासस्थानी निघून गेले. 

सरकार बद्दल शिवसेनेला विचार; शरद पवारांचे धक्कादायक वक्तव्य

अजित पवार दिल्लीत?
आज, सकाळी शरद पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न मीडियाने केला होता. त्यावेळी पवार यांनी सत्ता स्थापनेबद्दल शिवसेनेला विचारा, असे सांगून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी झिडकारले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ता स्थापनेविषयी महाशिवआघाडीत संभ्रम असल्याचे वृत्त काही टीव्ही चॅनेल्सनी सुरू केले होते. दरम्यान, आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार दिल्लीत दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचे वृत्ता काही टीव्ही वाहिन्यांनी दिले आहे. 

आणखी बातम्या वाचा

मुख्य बातम्या

ताज्या बातम्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar meets congress leader sonia gandhi