esakal | पवार-सोनिया बैठकीनंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम; पवार काय म्हणाले?
sakal

बोलून बातमी शोधा

ncp leader sharad pawar press conference after meeting with sonia gandhi

पवार-सोनिया बैठकीनंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम; पवार काय म्हणाले?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही अजून सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. आज, दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकीनंतर सरकार स्थापनेचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटे चर्चा झाल्यानंतरही सरकार स्थापनेसंदर्भात आम्ही काहीच बोललो नाही, असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाशिवआघाडीच्या भवितव्याविषयी सस्पेन्स वाढला आहे. आमच्याकडे सहा महिन्यांचा वेळ आहे, असे सांगून पवार यांनी चर्चेचं गुऱ्हाळ दीर्घकाळ चालणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

सरकार स्थापनेविषयी शिवसेनेला विचारा; पवारांचे वक्तव्य

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सत्ता स्थापनेवर चर्चाच नाही 
सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीची माहिती दिली. पवार म्हणाले, 'सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती देण्याचं काम केली. इतरही विषयांवरही चर्चा झाली. पण, प्रामख्याने राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय झाला आहे. दोन्ही पक्षांमधील काही महत्त्वाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यावर चर्चा केली जाईल. आमच्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील विषयांवर चर्चा झाली आमच्यात सत्ता स्थापनेवर काहीच चर्चा झाली नाही. किमान समान कार्यक्रम त्यासाठीचा समन्वय अशा कोणत्याही विषयांवर चर्चा झालेली नाही.'

काँग्रेसने शिवसेनेपेक्षा भाजपसोबत जावे; कोणी दिला सल्ला?

घटकपक्षांना विश्वासात घेऊ 
विधानसभा निवडणूक लढवताना आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय कवाडे गट, समाजवादी पार्टी, शेकाप यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढवली होती. त्यामुळं त्या आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा गरजेची आहे. अद्याप त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. राजू शेट्टी, समाजवादी पक्षाला आम्ही विश्वासात घेऊनच पुढे जाऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, किमान समान कार्यक्रमाबाबत आम्ही आग्रही असून, आमच्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी एका टीव्ही चॅनेलला दिली.

अन् शरद पवार भडकले
तुम्ही शिवसेनेसोबत आहात का? या प्रश्नावर 'आम्ही सगळ्यांसोबत आहोत. तुमच्यासोबतही आहोत.', असं उत्तर शरद पवार यांनी दिले. तर, संजय राऊत खोटे बोलत आहेत का? या प्रश्नावर मात्र शरद पवार भडकले. 'संजय राऊत यांच्याविषयी असं बोलणं चुकीचं आहे. एखाद्या संसद सदस्याविषयी तुम्ही असे कसे बोलू शकता.', अशा शब्दांत पवार यांनी राग व्यक्त केला. 

loading image