पवार-सोनियांच्या भेटीतून नवी राजकीय समीकरणे : तटकरे

वृत्तसंस्था
Monday, 4 November 2019

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीने नवी समीकरणे बनू शकतात. महायुतीला पूर्ण बहुमत असताना ते सत्तास्थापनेचा दावा करू शकलेले नाहीत. आम्ही शिवसेनेच्या संपर्कात आहोत. संजय राऊत यांनी 170 संख्याबळ असल्याचे सांगताना काहीतरी विचार केला असेल. त्यांनी हा जादुई आकडा कोठून काढला हे माहिती नाही.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज (सोमवार) दिल्लीत भेट होत असून, या भेटीतून नवी राजकीय समीकरणे बनू शकतात, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या कार्याध्यक्षा म्हणतात, शरद पवारांना मुख्यमंत्री करा

भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने सत्तेत कोण येणार हे अद्याप निश्चित नाही. आज दिल्लीत राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेबाबत तटकरे यांनी शक्यता वर्तविली आहे.

विधानसभा अध्यक्ष शिवसेनेचा?

तटकरे म्हणाले, की शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीने नवी समीकरणे बनू शकतात. महायुतीला पूर्ण बहुमत असताना ते सत्तास्थापनेचा दावा करू शकलेले नाहीत. आम्ही शिवसेनेच्या संपर्कात आहोत. संजय राऊत यांनी 170 संख्याबळ असल्याचे सांगताना काहीतरी विचार केला असेल. त्यांनी हा जादुई आकडा कोठून काढला हे माहिती नाही. पण, राज्यपालांना भेटून ते रोखठोक मत मांडतील, असे वाटते. पवार-सोनिया गांधी यांची भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Sunil Tatkare talked about Sharad Pawar and Sonia Gandhi meeting