RSS ची मानसिकता तालिबानसारखी- राष्ट्रवादी काँग्रेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

तालिबान ही दहशतवादी संघटना आणि RSS यांची विचारसरणी समांतर असल्याचे सांगत राष्ट्रवादीने त्यांची तुलना केली. 

नवी दिल्ली- केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या शिरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बक्षीस जाहीर केले आहे, यावरूनच संघाची तालिबानी मानसिकता दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. 

'एकीकडे ते दहशतवाद्यांचा निषेध करतात आणि दुसरीकडे ते दहशतवाद पसरवत आहेत. संघाच्या या घोषणेवरून त्यांची विचारसरणी उघड झाली आहे. आणि त्यांचे विचार तालिबानसारखे असल्याचे त्यावरून दिसून येते,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर यांनी म्हटले आहे. 

तालिबान ही दहशतवादी संघटना आणि RSS यांची विचारसरणी समांतर असल्याचे सांगत राष्ट्रवादीने त्यांची तुलना केली. 
राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार माजिद मेमन म्हणाले, 'RSSची ही घोषणा म्हणजे कायद्याचे उल्लंघन आहे. अशा वक्तव्यांनी लोकांना चिथावणी दिली जाते आणि लोकांना कायदा हातात घेण्यास प्रवृत्त केले जाते.'

मुख्यमंत्री पिनाराई विजयन मारून त्यांचे शीर आणणाऱ्याला एक कोटी रुपये देऊ, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निदर्शनांदरम्यान त्यांच्या आंदोलनाचे प्रमुख कुंदन चंद्रकांत यांनी विजयन यांना मारणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. या धक्कादायक घोषणेमुळे राजकीय खळबळ उडाली. 
 

Web Title: NCP says RSS has talibani mindset