Supreme Court on NCP: नार्वेकरांच्या निकालाविरोधातील NCPच्या याचिकेवरील सुनावणी संपली; SCचे निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश

Supreme Court on NCP: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं होतं.
Shivsena NCP MLA Disqualification Hearing Supreme Court on assembly speaker rahul narwekar Maharashtra Politics
Shivsena NCP MLA Disqualification Hearing Supreme Court on assembly speaker rahul narwekar Maharashtra Politics

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार यांच्या बाजून निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

यावर आज सुनावणी पार पडली, यावेळी सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश देताना निवडणुकीपर्यंत आत्ता त्यांना दिलेलं नाव कायम ठेवा असं म्हटलं आहे. तसेच नव्या चिन्हाबाबत निश्चित कालावधीत निकाल द्यावा असे निर्देशही दिले आहेत. (ncp supreme court hearing against rahul narvekar verdict sc gives instruction to election commission)

अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे त्यांचं चिन्ह असल्याचा निकाल नुकताच निवडणूक आयोगानं दिला होता. या निकालाविरोधात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं आज नोटीस काढली. (Marathi Tajya Batmya)

या नोटिशीत सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला जे नाव दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार ते निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावं. तसेच शरद पवार हे नव्या निवडणूक चिन्हासाठी पुन्हा निवडणूक आयोगात जाऊ शकतात. शरद पवार गटानं अर्ज केल्यानंतर आठवड्याभरात निवडणूक आयोगानं यावर निर्णय द्यावा, असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं यावेळी दिले. (Latest Marathi News)

Shivsena NCP MLA Disqualification Hearing Supreme Court on assembly speaker rahul narwekar Maharashtra Politics
Chandigarh Mayor Poll: रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह यांच्यावर होणार कारवाई! सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय वाचा

अजित पवार गटाला पक्ष अन् चिन्ह बहाल

दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता आणि चिन्ह कोणाचं? यावर निकाल दिला होता. त्यानुसार अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही बहाल करण्यात आलं. यानंतर १५ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल देताना ते अजित पवार गटालाच दिलं. तसेच तांत्रिक तृटींचा दाखला देत दोन्ही गटांचे आमदारही पात्र ठरवले. पण हा निकाल पक्षपती असल्याचा आरोप करत शरद पवार गटानं या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com