धक्कादायक प्रकार उघड! स्टँप पेपरवर मुलींचा लिलाव; 'एनसीडब्ल्यू'ची टीम करणार चौकशी

Crime news
Crime news

जयपूर - राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात कर्जाच्या परतफेडीसाठी स्टॅम्प पेपरवर मुलींचा कथित लिलाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी शुक्रवारी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी भिलवाडा येथे एक पथक पाठविण्यात येणार आहे. (auctioning of girls on stamp paper )

Crime news
कोंबड्याचा बळी द्यायला गेला मात्र, स्वतःच जीव गमावून बसला; वाचा धक्कादायक घटना

एनसीडब्ल्यू प्रमुख म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांपासून अशा घटना घडत आहेत, परंतु राज्य सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणी एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा १ नोव्हेंबर रोजी राजस्थानचे मुख्य सचिव आणि भिलवाडा एसपींची भेट घेणार आहेत.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनसीडब्ल्यूने दोन समिती स्थापन केली आहे. गावातील अनेक वाड्यावस्त्यांमध्ये स्टॅम्पपेपरवर वेश्या व्यवसायासाठी मुलींची विक्री केली जाते, असे निदर्शनास आणून दिल्याचा दावा आयोगाने केला आहे. एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा शर्मा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या प्रकरणात त्वरित कारवाई करावी आणि या प्रकरणाची आयोगाला माहिती द्यावी, अशा सूचना केल्या आहेत. याशिवाय सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, असंही पत्ररात नमूद करण्यात आलं आहे.

Crime news
Tata Airbus Project: 'एअरबस' प्रकल्प नाशिकला नेण्यासाठी छगन भूजबळांनी दिलं होतं पत्र

दरम्यान, राजस्थान राज्य महिला आयोगानेही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलींची स्टॅम्पपेपरवर विक्री होत असल्याच्या वृत्ताची दखल घेत डीजीपी आणि भिलवाडा जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. राज्य महिला आयोगाने याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून सात दिवसांत अहवाल मागवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com