उपराष्ट्रपती निवडणुकीत NDAचे अचानक ११ मतदार वाढले, मोठ्या पक्षाचा पाठिंबा; काँग्रेस म्हणते, विश्वासघात

उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाआधी वाएसआरसीपीचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
NDA Gains 11 Extra Votes in Vice President Election After YSRCP Support

NDA Gains 11 Extra Votes in Vice President Election After YSRCP Support

Esakal

Updated on

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. एनचीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवलंय. मतदानाच्या आधी एनडीएला आणखी एका बड्या पक्षाने पाठिंबा दिलाय. वाएसआरसीपीचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे एनडीएच्या मतांमध्ये थेट ११ मतांची वाढ झालीय. वाएसआर काँग्रेसकडे लोकसभेत चार आणि राज्यसभेत सात खासदार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com