BJP Declares Maharashtra Governor as Nominee : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. सी. पी. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.